धामोडी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
धामोडी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
लेवाजगत न्युज:-आज धामोडी ता.रावेर परीसरात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट सायंकाळी ४:३० ते ५.०० वाजे दरम्यान केळी ऊत्पादक शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले.
धामोडी ,कोलदा ,कांडवेल शिंगाडी ,वाघाडी या भागात प्रचंड प्रमाणात वादळ झालं सर्व केळी भागांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे लोकप्रतिनिधीकडून अपेक्षा प्रशासनास तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्या. आमदार चंद्रकांत पाटील यांना फोन करून सर्व प्रकरण कळवले त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यांच्याशी संपर्क साधून प्रशासनास तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे प्रयत्न केले जातील असे आमदार साहेबानी सांगितले प्रसंगी उपतालुक प्रमुख विनोद भाऊ ,राजू भाऊ, छोटू पाटील ,प्रल्हाद भाऊ ,तुषार कचरे, सर्व शेतकरी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत