मोहोचापाडा येथे पाणीपुरवठा योजनेचे, रस्त्याचे उद्घाटन आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न
मोहोचापाडा येथे पाणीपुरवठा योजनेचे, रस्त्याचे उद्घाटन आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न
उरण प्रतिनिधी(सुनील ठाकूर ):-आज मोहोचापाडा येथे पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन समारंभ त्याचप्रमाणे मोहो-पाली जोड रस्ता उद्घाटन समारंभ माननीय आमदार बाळाराम पाटील साहेब, मा.सभापती काशिनाथ पाटील साहेब, शेकाप तालुका चिटणीस आणि माजी उपसभापती राजेश केणी ,जि प सदस्य विलासजी फडके ,आदर्श सरपंच अनिल ढवळे, पनवेल भातगिरणीचे चेअरमन रवींद्र पाटील ,माजी सरपंच सुभाष भोपी ,पुरोगामी युवक संघटना पनवेल तालुका अध्यक्ष पुरुषोत्तमजी भोईर ,नैना प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेठ शेळके, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर जी लाड ,माजी सरपंच भारतभाई भोपी , माजी सरपंच सुरेश कडव, रामदास भोईर ,माऊली प्रतिष्ठान अध्यक्ष भास्करजी भोईर शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे माऊली प्रतिष्ठान चे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळेस सरपंच अनिल ढवळे यांनी प्रास्ताविक करताना विविध मुद्दे छेडले खऱ्या अर्थाने या गावाला पाण्याची व्यवस्था आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यामध्ये शेकापने पुढाकार घेतला त्याचप्रमाणे स्वतः शिवकर गावांमध्ये जे काम केलं आणि आज राज्यभर आदर्श सरपंच म्हणून चे नाव लौकीक आहे त्यामागे शेतकरी कामगार पक्ष आणि आमदार बाळाराम पाटील साहेब आहेत हे त्यांनी आवर्जून मांडलं.
सुभाष भोपी यांनी आपल्या मनोगतात पनवेल मधील भाजपा म्हणजे फक्त थापा मारणारे पुढारी अशाप्रकारचा उल्लेख केला खरं काम आणि जनतेसाठी काम करणारा पक्ष शेकाप आहे आणि जास्तीत जास्त मंडळींनी शेतकरी कामगार पक्षामध्ये येण्याचं आवाहन केलं.
तालुका चिटणीस राजेश केणी यांनी आपल्या मनोगतामध्ये शेतकरी कामगार पक्ष म्हणजे शब्दाला जागणारा पक्ष त्याचप्रमाणे आज तगायत तालुक्यामधील 90 टक्के पेक्षा जास्त विकास काम ही शेतकरी कामगार पक्षाने केलेली आहेत याची आठवण करून दिली .
दि बा.पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या साडेबारा टक्के च्या लढ्याची आठवण देखील राजेश केणी यांनी दिली आणि शेकापने दिलेल्या त्या लढ्यामुळेच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना भाकरी मिळाली असा उल्लेख त्यांनी केला. आज तालुक्यात प्रतिनिधी मंडळी यांनी स्वतःला विचारा व कि आपणास यशाची पहिली पायरी नक्की कोणी दाखवली कोणत्या पक्षाने दाखवली .??
आपण जे पदाधिकारी म्हणून आज मिरवतो त्यामागे पहिला शेकाप पक्ष आहे हे विसरून चालणार नाही . पैशाच्या मोहापायी आपल्या विचारांची गद्दारी करू नका आपल्या आजी आजोबा, आई-वडिलांपासून शेकापचा लाल झेंडा ज्यांनी सांभाळला.त्या पक्षाचा झेंडा खाली येऊन देणार नाही हा निर्धार करावा असं मत व्यक्त केलं, पुढील काळामध्ये देखील या विभागाच्या विकासाच्या दृष्टीने शेकाप कायम अग्रेसर राहील असं त्यांनी सांगितलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत