मुंबई येथे 15 वी राष्ट्रीय समता साहित्य अकादमी परिषद संपन्न
उरण प्रतिनिधी (सुनिल ठाकूर )- कलेच्या व्यसपीठाद्वारे आचार विचार प्रदान करू शकतो. याच बरोबर जसा माणूस विचार करतो तसा तो बनतो. त्यामुळे प्रत्येकाने सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. याचबरोबर प्रत्येकामध्ये समतेचे प्रेम रुजविण्याची गरज आहे. असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यीक आचार्य रतनलाल सोनाग्रा यांनी दामोदर नाट्यगृह, परेल मुंबई, समता साहित्य अकादमी तर्फे आयोजित केलेल्या 15 व्या राष्ट्रीय साहित्य परिषदेत अध्यक्ष या नात्याने केले. यावेळी व्यासपीठावर सेलेब्रिटी अतिथी म्हणून हेमांगी राव- अभिनेत्री, अर्जुन यादव- अभिनेता, दादुस संतोष- गायक, डॉ स्नेहा देशपांडे- समाज सेविका, डॉ संदेश शिरसाठ(बेंच ऑफ मॅजिस्ट्रेट) , श्री योगेश पाटणकर, डॉ कौतिक दांडगे- अध्यक्ष महाराष्ट्र बाजार पेठ,, स्वागताध्यक्ष- डॉ डी एस तांडेकर राष्ट्रिय अध्यक्ष समता साहित्य अकादमी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
समता ही मौलिक आहे. समतेतून ममता येते आणि ममतेतून एकात्मता. आज जगतिकीकरणाबाबत सर्वत्र बोलले जात आहे परंतु या जागतिकीकरणात काय वाईट आणि काय चांगले आहे हे समजणे आवश्यक आहे. जर यातून वेगळा अर्थ घेतला तर आपली सत्वशीलता गमावून बसण्याची शक्यता आहे असे मत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ डी एस तांडेकर यांनी आपल्या प्रस्ताविकेत व्यक्त केले.
यावेळी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावर विविध क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेल्याचें प्रमुख पाहुण्यांचे हस्ते शाल, मानचिन्ह, प्रमाणपत्र व पदक देऊन समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आसाम, मणिपूर, बिहार, वेस्ट बंगाल, छत्तीसगड, मेघालया, ओडिशा, मध्यप्रदेश, राजस्थान,दिल्ली, व महाराष्ट्र या राज्यातून सत्कारमूर्ती आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत