Header Ads

Header ADS

नीलगायीच्या धडकेत प्रवासी रिक्षा कलंडली एक ठार; नीलगायीसह आठ प्रवासी जखमी

 

Nīlagāya-dhaḍakēta-pravāsī- rikṣā- kalaṇḍalī'ēka-ṭhāra-nīlagāyīsaha-āṭha-pravāsī-jakhamī

नीलगायीच्या धडकेत प्रवासी रिक्षा कलंडली
एक ठार; नीलगायीसह आठ प्रवासी जखमी

लेवाजगत न्यूज जळगाव-

महामार्गावरून भरधाव वेगात येणाऱ्या प्रवासी रिक्षेस रस्ता ओलांडणाऱ्या नीलगायीने धडक दिली. या अपघातात रिक्षेतील एक प्रवासी जागीच ठार झाला तर उर्वरित आठ जण जखमी झाले आहे. हा अपघात सोमवारी रात्री ८ वाजता जळगाव - भुसावळ महामार्गावरील टीव्ही टॉवरसमोर झाला.

    साबीर सत्तार बागवान (वय ४०, रा. जाम मोहल्ला, भुसावळ) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. एमएच-१९, व्ही- ९५२१ क्रमांकाची रिक्षा भुसावळहून प्रवासी घेऊन जळगावकडे निघाली होती. टीव्ही टॉवरजवळ रस्ता ओलांडणारी नीलगाय थेट रिक्षेस धडकली. यात रिक्षेने दोन पलटी घेतल्या. त्यामुळे रिक्षात बसलेले प्रवासी नसीम शेख बागवान (वय ६५, रा. धुळे), आदिल मकबुल बागवान (वय १३, दोघे रा. तांबापुरा), मोहंमद आलम मोहंमद जान (वय ४८, रा. खडकारोड, भुसावळ) व बबिता कन्हैयालाल बडगुजर (वय ४५, रा. पिंपळकोठा, ता. एरंडोल) हे गंभीर जखमी झाले आहेत. 

अपघातानंतर रुग्णालयामध्ये मोठी गर्दी अपघातातील जखमी रुग्णालयात पोहोचल्यानंतर नातेवाइकांनी गर्दी केली होती. यातील नसरीन शेख व साहिल हे दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्यास दुखापत झालेली असल्यामुळे रात्री उशिरा सीटीस्कॅन केले.

  नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमी व मृतास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आले. तर काही जखमी खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी निघून गेले. या अपघातात नीलगाय जखमी झाली आहे. दरम्यान, मृतास रुग्णालयात पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.