चिर्ले गावठाण येथील युवा नेते सामाजिक कार्यकर्ते दिपक मढवी आदर्श लोक सेवक पुरस्काराने सन्मानित..
चिर्ले गावठाण येथील युवा नेते सामाजिक कार्यकर्ते दिपक मढवी आदर्श लोक सेवक पुरस्काराने सन्मानित..
उरण (सुनिल ठाकूर. ):- चिर्ले गावठाण पंक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते दिपक मढवी यांना खऱ्या अर्थाने लोक सेवक म्हटले पाहिजे. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या उक्ती प्रमाणे दिपक मढवी जन सेवा करत असतात. त्यांच्या पर्यंत समस्या पोचली आणि त्याचे निराकण झाले नाही असे कधीही होत नाही. गरीब गरजूना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.. गावातील रस्त्यांची निर्मिती गटारांचे बांधकाम. स्वछता अभियान. अशा त्यांच्या उपक्रमातून जन आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. मोठे पद असो किंवा नसो विकासाची कामे करण्या साठी लागते ते म्हणजे धोरणी नेतृत्व आणि प्रचंड इच्छा शक्ती आणि नेमकी हीच शक्तिस्थाने आहेत दिपक मढवी यांच्यात. अशा युवा नेते सामाजिक कार्यकर्ते दिपक मढवी यांच्या कार्याची दखल घेत नुकताच सिटी बेल समुहा तर्फे रायगड जिल्ह्या च्या पालक मंत्री आदिती ताई तटकरे यांच्या हस्ते त्यांना आदर्श लोक सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्यात खासदार श्रीरंग (अप्पा) बारणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासमवेत आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत,पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर सी घरत, शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार तथा प्रवक्ते बबनदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत भाऊ पाटील, शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे प्रमुख अतिथी म्हणून मंचावर विराजमान होते. पनवेलच्या विरुपाक्ष हॉल येथे हा शानदार सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सिटी बेल वृत्त समूहाचे समूह संपादक मंदार दोंदे यांनी प्रास्ताविक केले
तर कार्यक्रमाचे अंती समूह संपादक विवेक मोरेश्वर पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत