Header Ads

Header ADS

सावद्यात शनिवारी होणार कमी दाबाने पाणी पुरवठा


 सावद्यात शनिवारी होणार कमी दाबाने पाणी पुरवठा

लेवाजगत न्युज:- शहरातील नागरिकांना कळविण्यात येते की मांगलवाडी येथून सावदा शहरास पाणीपुरवठा करणारी मेन लाईन रेल्वे रुळाखाली लिकेज झाली अजून त्याचे काम कर्मचारी सकाळ पासून करीतआहे. त्या दुरुस्तीच्या कामामुळे शनिवारी होणार पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.

      या भागात होणार कमी पाणीपुरवठा 

 सोमेश्वर नगर ,अमोल नगर, निमजाय माता नगर, सुगंगा नगर ,ओम कॉलनी, लक्ष्मीनारायण नगर ,साई पार्क, गवत बाजार अर्ध भाग, रविवार पेठ या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. 

  तरी सावदा शहरातील नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाणी विनाकारण खर्च करू नये व पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक कैलास कडलक, मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.