वादळाने बळी गेलेल्या बालकाच्या कुटूंबास शासनाकडून मदतीसाठी प्रयत्न करणार -तहसिलदार देवगुणे
वादळाने बळी गेलेल्या बालकाच्या कुटूंबास शासनाकडून मदतीसाठी प्रयत्न करणार -तहसिलदार देवगुणे
लेवाजगत न्यूज सावदा-खिरोदा येथील बेघर वस्तीत बुधवार दुपारी झालेल्या चक्रीवादळामुळे विजेच्या तारा तुटल्याने साडेतीन वर्षांच्या अफसर अकिल तडवी या लहान बालकास वीज प्रवाहक तारेचा शाॅक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
गुरुवार सकाळी ही दुर्दवी घटना घडलेल्या स्थळाची पाहाणी व कुटुंबाचे सात्वव करताना तहसिलदार उषाराणी देवगुणे, खिरोदा मंडळ अधिकारी बंगाळे,तलाठी,सावदा पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक समाधान गायकवाड सह आमदार शिरीष दादा चौधरी यांचें सहाय्यक भानुदास मेढे, रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास ताठे, उपसरपंच सावखेडा अल्लादिन तडवी, महेंद्र पाटील गौरखेडा ग्रामपंचायत सदस्य, अनेकांनी सदर कुटुंबाला सहानुभूती देवून लवकरात लवकर शासनाकडून सर्वपरी मदत मिळवून देण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील असे आश्वासन यांनी दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत