Header Ads

Header ADS

नगरपरिषदा , नगरपंचायतीं च्या सदस्यपदाच्या आरक्षणाची १३ जून रोजी सोडत

 

नगरपरिषदा , नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या आरक्षणाची १३ जून रोजी सोडत 

लेवाजगत न्यूज मुंबई : राज्यभरातील २१६ नगरपरिषदा /नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १३ जून २०२२ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. 

 त्या अनुषंगाने १५ ते २१ जून २०२२ या कालावधित हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (९ जून) केली.

  

    आरक्षणाची सोडत काढण्यात येणाऱ्या २१६ मध्ये २०८ नगरपरिषदा आणि ८ नगरपंचायती आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्यपदांसाठी ही सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतीसाठी संबंधित जिल्हाधिकारी १० जूनला नोटीस प्रसिद्ध करतील.

     १३ जून २०२२ रोजी संबंधित ठिकाणी आरक्षण सोडत काढण्यात येईल. 

   आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या १५ ते २१ जून २०२२ या कालावधीत दाखल करता येतील. संबंधित विभागीय आयुक्त सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देतील.  

   आरक्षणाची अंतिम अधिसूचना १ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असेही आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.