वाराणसी बॉम्बस्फोटांप्रकरणी 16 वर्षांनी दहशतवादी वलीउल्लाहलाला फाशीची शिक्षा
वाराणसी बॉम्बस्फोटांप्रकरणी 16 वर्षांनी दहशतवादी वलीउल्लाहलाला फाशीची शिक्षा
लेवाजगत न्युज:-वाराणसीमध्ये २००६ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी गाझियाबाद जिल्हा आण सत्र न्यायालयाने दहशतवादी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
हा निर्णय 16 वर्षांनी सुनावण्यात आला आहे. वाराणसीतील संकट मोचन मंदिर आणि कँट रेल्वे स्थानकात २००६ रोजी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला होता. तर 35 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. त्याच दिवशी दशाश्वमेध घाटावरही स्फोटके आढळली होती.
वाराणसी पोलिसांनी ५ एप्रिल २००६ रोजी या प्रकरणी अलाहाबादच्या फूलपूर गावातील वलीउल्लाह याला लखनऊच्या गोसाईंगंजमधून अटक करण्यात आली होती. संकटमोचन मंदिर आणि कँट रेल्वे स्थानकात घातपाताचा परसवल्याप्रकरणी त्याच्यावरील आरोप ४ जूनला सिद्ध झाले होते.
कट रचून घातपात करणे आणि दहशतवाद परसवल्याप्रकरणी त्याच्यावरील आरोप 4 जूनला सिद्ध झाले होते.
वलीउल्लाह याचा खटला लढवण्यास वारणसीतील वकिलांनी नकार दिला होता. त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे प्रकरण गाझियाबाद जिल्हा न्यायालकाकडे वर्ग केले होते. त्यानंतर याची सुनावणी सुरू होती. गाझियाबादचे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या न्यायालयाने 4 जूनला वलीउल्लाहला दोषी ठरवले होते. आता 16 वर्षांनी प्रकरणाचा निकाल सुनावण्यात आली असून वलीउल्लाह याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत