Header Ads

Header ADS

प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज, मोठे वाघोद्यातील १२ वीचा निकाल ९९.३१ टक्के


 प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज, मोठे वाघोद्यातील १२ वीचा निकाल ९९.३१ टक्के


लेवाजगत न्युज मोठे वाघोदे :- प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज, मोठे वाघोदे, ता. रावेर चा इयत्ता १२ वीचा निकाल ९९.३१% लागला असून विज्ञान शाखेत पाटील अनुष्का गोपाल ही विद्यार्थीनी ९०.१७% मिळवून प्रथम आली, तर कुरकुरे मानसी सतिष ही विद्यार्थीनी ८९.३३% मिळवून  द्वितीय तर तृतीय ८८.३३% मिळवून कोळी निकिता अरुण ही विद्यार्थीनी आली. 

  तर कला शाखेत वानखेडे दिव्या विनोद, गवळी राजश्री राजेंद्र व माळी रोहिणी सुनिल या तीन विद्यार्थीनी ८०.३३% मिळवून प्रथम आल्या, तर वाघ वैशाली मोहन ही विद्यार्थीनी ७९.००% मिळवून द्वितीय तर तृतीय ७८.८३% मिळवून महाजन साक्षी चंद्रकांत ही विद्यार्थीनी आली. 

  तसेच विज्ञान शाखेत मागसवर्गीयातून कोळी निकिता अरुण ही विद्यार्थीनी ८८.३३% तर कला शाखेतून वाघ वैशाली मोहन ही विद्यार्थीनी ८०.३३% मिळवून प्रथम आली. सदर विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री व्ही. एस. महाजन, पर्यवेक्षक श्री आर. पी. बडगुजर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे मार्गदर्शन लाभले व त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


संस्थेचे अध्यक्ष श्री पी. टी. महाजन सर, उपाध्यक्ष श्री श्रावण सिताराम महाजन, चेअरमन श्री डी. के. महाजन, सचिव श्री किशोर जगन्नाथ पाटील, सहसचिव श्री. पी. एल. महाजन व सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.