Header Ads

Header ADS

सावदा पालिका संचलित हायस्कूल चा शास्त्र शाखा निकाल १०० टक्के, कला शाखा ९५ टक्के

 

Savada-Palika-Sanchalit-High School-Cha-Shastra-Branch-Results-100-Percent-Arts-Branch-95-Percent


सावदा पालिका संचलित हायस्कूल चा शास्त्र शाखा  निकाल १०० टक्के, कला शाखा ९५ टक्के

लेवाजगत न्यूज सावदा -उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा  झालेल्या इयत्ता १२वी च्या  परीक्षेचा निकाल बुधवार रोजी ऑनलाईन पध्दतीने जाहिर झाला असून पालिका संचलित श्रीमती आनंदीबाई गंभीरराव हायस्कुल व नामदेवराव गोमाजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के जाहीर झाला असून विज्ञान शाखेत ११६ विद्यार्थी समाविष्ट झाले होते. ते सर्व पास झाले असून प्रथम क्रमांक बेंडाळे गार्गी रेवानंद एकूण गुण ५२८ ( ८८ टक्के ), द्वितीय क्रमांक सोनवणे हर्षद संजय एकूण गुण ५१५( ८५.३३ टक्के ), १२ वी कला शाखेचा निकाल ९५.०८ टक्के जाहीर झाला असून प्रथम क्रमांक चौधरी जयश्री सोपान एकूण गुण ४९६ ( ८२.६७ टक्के ) ,द्वितीय क्रमांक भोई पूजा प्रकाश एकूण गुण ४७० ( ७८.३३ टक्के ) , १२ वी विज्ञान ११६ व  १२ वी कला १२२असे एकूण  २३८ विद्यार्थी यांनी परीक्षा दिली होती.

    त्यात विज्ञान शाखा १०० टक्के व कला शाखा ९५.०८ टक्के  निकाल जाहीर झाला. सर्व यशस्वी विद्याथ्यांचे प्रशासक कैलास कडलक ,मुख्यधिकारी किशोर चव्हाण , मुख्याध्यापक  सी.सी. सपकाळे , पर्यवेक्षक जे.व्हि.तायडे , व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.