भाजपचे श्रीकांत देशमुखांचा महिलेसोबतचा बेडरूमधील VIDEO Virel
भाजपचे श्रीकांत देशमुखांचा महिलेसोबतचा बेडरूमधील VIDEO Virel—
वृत्त संस्था सोलापूर : - सोलापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे . ती म्हणजे भाजप नेत्याचा महिलेसोबत बेडरूममध्ये घालवलेल्या क्षणांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे . हा व्हिडिओ त्या नेत्यासोबत उपस्थित महिलेने व्हायरल केला आहे . व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सोलापूरचे भाजपनेते श्रीकांत देशमुख यांचे एका महिलेसोबत बेडरूममध्ये घालवलेले क्षण टिपण्यात आले आहेत . या व्हिडिओमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे . हा व्हिडीओ महिलेने व्हायरल केला आहे . व्हिडिओमध्ये महिला श्रीकांत देशमुख यांच्यावर बोट दाखवत गंभीर आरोप करत आहे . आज सकाळपासूनच हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की श्रीकांत देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला . देशमुख यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सुपूर्द केला आहे . चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे . नेते श्रीकांत देशमुख यांनी राजीनामा देताना कोणतेही कारण दिलेले नाही .
Viral व्हिडीओ👇
https://mobile.twitter.com/hashtag/shrikantdeshmukh?src=hashtag_click
श्रीकांत देशमुख आणि संबंधित महिला एका बेडरुम मध्ये असतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये प्रसारीत झाली आहे. यात संबंधित महिला देशमुख यांच्या विरोधात भाष्य करीत असताना बाजूलाच अंगावर बनियान परिधान केलेले श्रीकांत देशमुख हे तिच्या हातातील स्मार्टफोन बळजबरीने हिसकावून घेताना दिसतात. यावेळी महिला देशमुख यांच्यावर घानेरडे आरोप करताना दिसत आहे. श्रीकांत देशमुख यांनी मला फसवले आहे. त्याच्या पत्नीशिवाय त्याचे माझ्याशीही नाते आहे, असा आरोप महिलेने केला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत