Contact Banner

हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले ; नदीकाठचे नागरिक सतर्क राहा !

 हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले ; नदीकाठचे नागरिक सतर्क राहा !

लेवाजगत न्युज:- सावदा येथून जवळच असलेलं हतनूर धरणाचे २४ दरवाजे आज दिनांक:- १३/०७/२०२२ रोजी रात्री ८ वाजता उघळण्यात आले. त्यात २२ दरवाजे दुपारी ३ वाजे पासून उघडण्यात आले होते. आणि आता ३६ उघडण्यात आले आहेत.

  

    हतनुर धरणक्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे जलसंपदा विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की हतनूर धरणाचे 

४१  पैकी ३६  गेट पूर्ण उंची ने उघडण्यात आले असून( पाणी पातळीच्या वर काढण्यात आले असून ) तापी नदीपात्रामध्ये 

 1589.00 cumecs

56115.53 cusecs

इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे.  त्यामुळे कोणीही नदी पात्रात जाऊ नये अथवा आपले गुरढोरे नदीपात्रात सोडू नये तसेच आवश्यक खबरदारी घ्यावी.

असे आवाहन श्री.ध.ब.बेहेरे कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.