Header Ads

Header ADS

चोरट्यांनी चक्क मोबाईलचे ३ टॉवर पळवले; चोरी केली तरी कशी बघा बातमी

 

चोरट्यांनी चक्क मोबाईलचे ३ टॉवर पळवले; चोरी केली तरी कशी बघा बातमी

लेवाजगत न्युज:- सांगली-मिरज तालुक्यातील म्हैसाळ आणि बेडग येथील मोबाईल टॉवर चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. १८० फूट उंचीच्या लोखंडी टॉवरसह विद्युत साहित्य असा लाखो रूपयांचा मुद्देमाल भरदिवसा चोरट्यांनी ट्रकमधून लंपास केला आहे. याप्रकरणी जीटीएल कंपनीकडून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरज ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून मिरज तालुक्यातील बेडग आणि म्हैसाळ येथे तीन ठिकाणी मोबाईल टॉवर भाडे तत्त्वावर दिले होते. मात्र गेल्या वर्षभरापासून ते तांत्रिक कारणांमुळे बंद होते. पण बंद असलेले हे टॉवर गेल्या महिन्यात चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. 

 कंपनीचे अधिकारी तंत्रज्ञ संदीप आवळे हे टॉवर पाहणीसाठी गेलेले असता, त्यांना टॉवर गायब असल्याचे निदर्शनास आले. तब्बल १८० फूट उंच आणि अवजड असे ३ टॉवर चोरीला गेल्याची बाब निदर्शनास आली.

चोरट्यांनी भरदिवसा हे टॉवर काढले आहेत. यावेळी चोरट्यांनी आजूबाजूच्या लोकांना कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करत हे तिन्ही टॉवर उखडून काढत त्याठिकाणी असणारे इतर विद्युत साहित्य देखील ट्रकमध्ये भरून लंपास केले आहे.  याप्रकरणी जीटीएल कंपनीचे अधिकारी संदीप आवळे यांनी टॉवर चोरीची फिर्याद दाखल केली, असून अधिक तपास सुरू असल्याचे मिरज ग्रामीण पोलिसांच्याकडून सांगण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.