Viral विडिओ - ट्रक च्या हॉर्न वर मुलांचा नागीण डान्स,मोर डान्स
Viral विडिओ - ट्रक च्या हॉर्न वर मुलांचा नागीण डान्स,मोर डान्स
लेवाजगत न्युज:- सध्या पावसाचं वातावरण आहे, सगळीकडे हिरवळ पसरली आहे, डोंगर, दऱ्या, धबधबे आणि धुक्यामुळे वातावरण एकदम ओक्केमधी झालं आहे. यातंच पावसात फिरायला जाण्याचा बेत म्हणजे एक प्रकारची मेजवानीच म्हणावी लागेल. पण फिरायला गेल्यावर मजा म्हणजे काय असते हो? फक्त डोंगर, दऱ्या, धबधबे आणि पावसात भिजणं म्हणजे मजा किंवा आनंद आहे का? तर नाही. प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे मग ती वेळ कोणतीही असो. असाच फिरायला गेलेल्या तरूणांच्या झिंगाट डान्सचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये फिरायला गेलेल्या तरूणांचा एक ग्रुप रस्त्यावरील एका ट्रकच्या हॉर्नच्या आवाजावर झिंगाट होऊन नाचताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये काही जण नागीन डान्स करत आहेत तर काहीजण रस्त्यावर लोळून नाचत आहेत. तर काहीजण मोर डान्स करत आहेत. घाट रस्त्यावरील एका मालवाहू गाडीच्या हॉर्नच्या आवाजावर ते नाचत आहेत पण भर रस्तात अशा प्रकारचं धाडस करण धोक्याचं ठरू शकतं. पावसाळ्यात घाट रस्त्यावरून गाड्या घसरण्याचं आणि दरड कोसळण्याचं प्रमाण अधिक असतं पण असं धाडस करताना आधी विचार करायला हवा.
असाच आंबोली घाटातील तरूणांच्या डान्सचा एक व्हिडीओ काल व्हायरल झाला होता. तरूणांच्या हुल्लडबाजीमुळे आंबोली घाटातील इतर पर्यटकांना त्रास सहन करावा लागला होता. पण अशी मस्ती करताना इतर पर्यटकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत