जळगाव जिल्ह्यात निवडणुकांसाठी रणधुमाळी, शिवसैनिक संभ्रमात "९ पालिकांची निवडणूक"
जळगाव जिल्ह्यात निवडणुकांसाठी रणधुमाळी, शिवसैनिक संभ्रमात "९ पालिकांची निवडणूक"
लेवाजगत न्युज:-राज्य निवडणूक आयोगाने कमी पाऊस असणाऱ्या भागातील व राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुकांचा (Jalgaon Elections) कार्यक्रम जाहीर केला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील नऊ नगरपलिकांचा समावेश असल्याने रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्यात शिवसेनेमध्ये झालेल्या बंडाळीमुळे जिल्ह्यातील सेना पदाधिकाऱ्यांमध्ये देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभ्रमासह अस्वस्थता निर्माण झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने कमी पाऊस असणाऱ्या भागातील व राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. १८ ऑगस्ट रोजी मतदान तर १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांसाठी दि. ८ जुलैपासूनच आचारसंहिता जारी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील 9 पालिकांची निवडणूक
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ या 'अ' वर्ग पालिकेसह अमळनेर, चाळीसगाव, वरणगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, फैजपूर, यावल या एकूण नऊ नगरपालिकांसाठी निवडणुक होणार आहे. पालिका निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांकडून स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.
राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडामुळे जिल्ह्यातील या पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मनात सभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करुन भाजपाशी सोबत करीत सत्ता आणली आहे.
या बंडात जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे ४ व १ सहयोगी असे पाचही आमदार सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात देखील आता ठाकरेंची शिवसेना व एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकांची तयारी करतांना शिवसेना पदाधिकारी, इच्छुकांमध्ये सभ्रम निर्माण होवून, ’कोणता झेंडा घेवू हाती’ अशीच अवस्था झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्या तरी ठाकरे शिवसेना महाविकास आघाडीसोबत होती, त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी तर शिंदे सेना भाजपासोबत असल्याने आता आघाडी कुणाशी करावी असा प्रश्न पदाधिकाऱ्यांना पडला आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी नेत्यांकडून मार्गदर्शनाची प्रतिक्षा पदाधिकारी करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत