Header Ads

Header ADS

विठ्ठल नामाची शाळा भरली --- शाळेची मुले वारकरी बनली

विठ्ठल नामाची शाळा भरली --- शाळेची मुले वारकरी बनली


 विठ्ठल नामाची शाळा भरली --- शाळेची मुले वारकरी बनली                                 

उरण(सुनील ठाकूर)..द्रोणागिरी .हायस्कुल करंजा  ( मराठी व सेमी इंग्रजी माध्यम) आज आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. पालखीतील विठ्ठल रखुमाईच्या प्रतिमेचे पूजन करून दिंडी नवापाडा व करंजा पाड्यात फिरवून परत हायस्कूल मध्ये आली.नवापाड्यात  दिंडीतील सर्वांनी मंदीरात  गणपती,हनुमंत व विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले.त्यावेळी मंदीरात आरती होऊन सर्वाँना प्रसाद व चहा देण्यात आला.दिंडीत हायस्कूल चेअरमन सिताराम नाखवा ,व्हा.चेअरमन के.एल.कोळी, सदस्य देविदास थळी,शरद पाटील, मुख्याध्यापक श्री एम .जी.म्हात्रे सर.शिक्षक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. काही विद्यार्थिं वारकरी व विठ्ठल रखुमाईच्या वेशभूषेत होते.नेहमीच द्रोणागिरी हायस्कूल करंजा कडुन आपल्या संस्कृती व परंपरा जपत विद्यार्थी व गावकरी यांनी परंपरेचे दर्शन घडविले जाते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.