Contact Banner

भुसावळ विभागात आज पासून ऐन उत्सवात ३६ रेल्वे गाड्या रद्द

 

36-train-trains-cancelled-from-today-in-Bhusawal-section

भुसावळ विभागात आज पासून ऐन उत्सवात ३६ रेल्वे गाड्या रद्द 

 लेवाजगत न्यूज भुसावळ -छत्तीसगडमधील दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे झोनमधील बिलासपूर विभागातील इंगूर स्टेशन ते रायगड झारसीगुडा सेक्शनमध्ये चौथ्या लाइनचे काम सुरू होत आहे. त्याचा परिणाम म्हणून भुसावळ विभागातून त्या भागात धावणाऱ्या तब्बल ३६ गाड्या रेल्वे प्रशासनाने २० ते ३० ऑगस्ट दरम्यान रद्द केल्या आहेत. त्यात हावडा-मुंबई मेल, शालिमार-एलटीटी अशा गाड्या सलग आठ दिवस रद्द आहेत. यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर भुसावळ विभागातून पुणे, मुंबई, अहमदाबादकडे जाणाऱ्यांची गैरसोय होईल. 

      हावडा मेल, शालिमार-एलटीटी सलग आठ दिवस बंद

संत्रागाची-पुणे (२० व २७), पुणे-संत्रागाची (२२ व २९), शालिमार-पोरबंदर (२६ व २७), पोरबंदर -शालिमार (२४ व २५), पुरी-जोधपूर (२४), जोधपूर-पुरी (२७), शालिमार-ओखा (२३ व ३०), ओ खा-शालिमार (२१ व २८), मालदा टाऊन-सूरत (२० व २७), सूरत-मालदा टाऊन (२२ व २९), हावडा-पुणे- हावडा (दोन्ही बाजूची २१ व २८), संत्रागाची-पोरबंदर(२८), पोरबंदर-संत्रागाची (२६), संत्रागाची-एलटीटी (२६ व २७), एलटीटी-संत्रागाची (२४ व २५), भुवनेश्वर-एलटीटी (२२,२५,२९), एलटीटी-भुवनेश्वर (२४,२७ व ३१), हटिया-एलटीटी (२६,२७), एलटीटी-हटिया (२८ व २९), हावडा-शिर्डी साईनगर (२५), साईनगर शिर्डी-हावडा (२७), हावडा-मुंबई (२६), मुंबई-हावडा (२८), एलटीटी-कामाख्य (२० व २७), कामाख्य-एलटीटी (२३ व ३०), हावडा-मुंबई मेल (२१ ते २८ आठ दिवस), मुंबई-हावडा मेल (दि. २१ ते २८ आठ दिवस), अहमदाबाद-हावडा, हावडा-अहमदाबाद, शालिमार-एलटीटी व एलटीटी-शालीमार या गाड्या (२१ ते २८), हावडा-पुणे (२०,२५,२७), पुणे-हावडा (२२,२७, २९).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.