रावेरला गुरांची कोंबून अवैध वाहतूक; ट्रक जप्त २३ गुरांची जळगावच्या गो शाळेत केली रवानगी
रावेरला गुरांची कोंबून अवैध वाहतूक; ट्रक जप्त २३ गुरांची जळगावच्या गो शाळेत केली रवानगी
लेवाजगत न्यूज रावेर |-बेकायदेशीररीत्या अत्यंत व निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला स्थानिक नागरिकांनी थांबवला. पोलिसांना संशय आल्याने ट्रकची ताडपत्री उघडून तपासणी केली असता गुरांची अवैधरित्या कोंबून कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याचे दिसून आले. दोन गुरांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी ट्रक पोलिसांनी जप्त केला असून उर्वरित २३ गुरांची जळगावच्या गो शाळेत रवानगी करण्यात आली आहे. एकूण ६ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. बऱ्हाणपूरकडून सावद्याकडे जाणाऱ्या एमएच १८ बीजी ३६८३ या क्रमांकाच्या ट्रकमधून पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा गुरे वाहतुकीचा परवाना न घेता २५ लहान मोठ्या वासऱ्या, गोहे व बैलांची वाहतूक केली जात होती. येथील चौकात ट्रक येताच तो थांबवला. मात्र चालक सलमान शाह, रा. राजापूर, ज्योतीनगर जि. शाजापूर हा ट्रक सोडून पळून गेला. पोलिस कर्मचारी संदीप घ्यार यांनी पाहणी केली असता त्यामध्ये गुरांची कोंबून वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. ट्रकचा क्लिनर रईस नशिर शाह, रा. नेहरूनगर कॉलनी, सरांगपूर, जि. राजगड यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी प्राणी अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत