Contact Banner

५० विद्यार्थी थोडक्यात बचावले; शाळेची बस खड्ड्यात कलंडली

 

५० विद्यार्थी थोडक्यात बचावले; शाळेची बस खड्ड्यात कलंडली

लेवाजगत न्युज:- शालेय विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणारी बस खड्ड्यात कलंडल्याची घटना नायगाव येथे घडली आहे. बस चालकाने वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा अपघात टळला. बसमध्ये अडकलेल्या ५० विद्यार्थ्यांना स्थानिकांनी आपातकालीन दरवाज्यातून सुखरूप बाहेर काढले. चालक आणि नागरिकांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला आहे.

अवर लेडी ऑफ वेलंकनी या शाळेची बस बुधवारी शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी सोडण्यासाठी निघाली होती. दरम्यान, नायगाव येथील सनटेक जवळील भागात पोहचताच वाहन चालकाचा अंदाज चुकला आणि बस रस्ता सोडून रस्त्याच्या कडेला घसरली गेली. यावेळी रस्त्याच्या कडेला खोलगट भागामुळे बसचा एका बाजूला तोल गेला आणि बस काहीशी एका बाजूला कलंडली.

यावेळी बसमध्ये जवळपास ५० हून अधिक शाळकरी मुलं होती. बस एका बाजूने कलंडल्याने त्यात असलेली शाळकरी मुलंही घाबरली होती. बस रस्त्यावरुन घसरल्याचं दिसताच परिसरातील नागरीक मदतीला धावून आले. बसमध्ये मुलं अडकून पडली होती. नागरीकांनी तात्काळ आपातकालीन दरवाज्यातून मुलांना बसमधून उतरवलं. त्यामुळे ५० मुलं थोडक्यात बचावले आहेत.

मुलांना बस बाहेर काढून तातडीने दुसऱ्या बसची सोय करण्यात आली. त्यानंतर या बसमध्ये बसवून मुलांना घरी सोडण्यात आले. सुदैवाने बस पुर्णपणे कलंडली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.