दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय शिंदे सरकार आज घेणार
दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय शिंदे सरकार आज घेणार
लेवाजगत वृत्तसेवा | खास मराठमोळ्या समजल्या जाणार्या दहीहंडीला राज्य सरकारने खेळाचा दर्जा देण्याची तयारी केली असून याबाबत आज अधिकृत घोषणा होणार आहे.
दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात यावा. अशी कधीपासूनच मागणी करण्यात येत होती. एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी याबाबतचे सूतोवाच केले होते. आता हा उत्सव दोन दिवसांवर आला असतांना राज्य सरकारने याला खेळाचा दर्जा देण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत आज विधानसभेत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र येथील या दहीहंडीला उत्सवाला खेळाचा दर्जा मिळणार आहे. यासोबत प्रो-कबड्डी प्रमाणेच लवकरच प्रो-दहीहंडी या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतला असून याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे सरकारचा हा निर्णय खूप महत्वाचा मानला जात असून याचे राज्यभरात स्वागत होण्याचे संकेत आहेत.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत