बहिणीसह एकुलता एक मुलगा असलेल्या प्रियकराचीही हत्या चोपड्यात ऑनर किलिंग, ५ भावांचे कृत्य, दोघे अल्पवयीन
बहिणीसह एकुलता एक मुलगा असलेल्या प्रियकराचीही हत्या चोपड्यात ऑनर किलिंग, ५ भावांचे कृत्य, दोघे अल्पवयीन
लेवाजगत न्यूज चोपडा -खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनेतून आपली एकुलती बहीण आणि तिचा घरात एकुलताच मुलगा असलेला प्रियकर यांना पाच भावंडांनी ठार केले. त्या पाच पैकी दोघे अल्पवयीन आहेत. चोपडा शहरालगत ही घटना १२ ऑगस्टच्या रात्री घडली.बहिणीच्या प्रियकरावर गोळी झाडून ठार केल्यावर अल्पवयीन आरोपी स्वतःच पोलिस ठाण्यात हजर झाला. तीनही सज्ञान आरोपींना अटक करण्यात आली असून अल्पवयीन दोघांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. मध्यप्रदेशातून सहजपणे उपलब्ध होत असलेल्या गावठी पिस्तुलचा प्रश्न यामुळे पुन्हा अधोरेखीत झाला.
वर्षा समाधान कोळी (२०, रा. सुंदरगढी, चोपडा) आणि राकेश संजय राजपूत (२२, रा. रामपुरा चोपडा) अशी ठार करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. भरत संजय रायसिंग (२१, रा. सुंदरगढी, चोपडा), मावस भाऊ तुषार आनंदा कोळी (२३, रा. चोपडा), बंटी ऊर्फ जय शांताराम कोळी (१९) यांच्यासह १५ आणि १७ वर्षांचे अल्पवयीन मुले यांनी हा गुन्हा केला आहे
वर्षा व राकेश यांचे गेल्या चार वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. राकेश हा केटरर्सचा व्यवसाय करत होता, तर वर्षा ही चोपडा महाविद्यालयात एफवायबीएचे शिक्षण घेत होती. या दोघांच्या प्रेमाला वर्षाच्या कुटुंबीयांकडून विरोध होता. राकेश वारंवार वर्षाच्या घरी येत होता. हे कोळी कुटुंबीयांना खटकत होते. दोघांमुळे समाजात बदनामी होत असल्याने राकेशने आपल्या घरी येऊ नये असे यापूर्वी त्यांनी बजावले होते. त्यानंतरही तो १२ ऑगस्ट रोजी रात्री वर्षाला भेटण्यासाठी घरी आला
या वेळी १७ वर्षांचा व दुसरा १५ वर्षांच्या भावांसह काकांचा मुलगा भरत व मावस भाऊ तुषार आनंदा कोळी व बंटी ऊर्फ जय शांताराम कोळी यांनी राकेशला हटकले. त्यांनी राकेशला तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवर बसवले आणि वर्षाचा लहान भाऊ व भरत रायसिंग यांनी वर्षाला दुसऱ्या दुचाकीवर बसवले. दोन्ही गाड्या शहरातील चिंच चौकाकडून जुना वराड रस्त्याकडे गेल्या. त्या ठिकाणी दुचाकी थांबवून राकेशला पाचही जणांनी बेदम मारहाण केली.
गावठी शस्त्रांचा प्रश्न ऐरणीवर या आरोपींनी गावठी पिस्तुलचा वापर केला आहे. हे पिस्तुल पोलिसांनी जप्तही केले आहे. चोपडा तालुका मध्यप्रदेशच्या सीमेलगत आहे. या सीमेलगत मध्यप्रदेशात असलेल्या उमर्टी गावात अवैध शस्त्र बनविण्याचा उद्योग मोठ्याप्रमाणात चालतो. तिथूनच गावठी पिस्तुल आणि अन्य शस्त्रे सहज जळगाव जिल्ह्यात येतात. माध्यमांतून आणि अन्य व्यासपीठांवरही हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो; पण त्याला आळा घालण्यात दोन्ही राज्यांच्या पोलिस प्रशासनाला यश आलेले नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत