परवाना ना घेता ड्रोन फोटोग्राफीस बंदी
परवाना ना घेता ड्रोन फोटोग्राफीस बंदी
लेवाजगत न्यूज भुसावळ -डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी शहरातील ड्रोन कॅमेरा व्यावसायिकांची बैठक घेतली. त्यात परवानगीशिवाय छायाचित्रण करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई हाेईल, असा इशारा नुकताच दिला.
डीवायएसपी कार्यालयात ही बैठक झाली. त्यात ड्रोन कॅमेरा व्यावसायिकांनी रेल्वेस्थानक, हतनूर धरण, आयुध निर्माणी, दीपनगर प्रकल्प, वाघूर धरण येथे पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय फोटो काढू नये. तालुक्यातील ही अतीशय महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. या ठिकाणी कुणीही ड्रोन कॅमेऱ्याने छायाचित्र काढल्याची माहिती मिळाल्यास संबंधिताला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत