Contact Banner

आमोदा येथे शेतात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

आमोदा येथे शेतात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू



 आमोदा येथे शेतात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

लेवाजगत न्यूज आमोदा तालुका यावल:- आमोदा येथील रहिवासी शेतकरी शेतात काम करीत असताना आज बुधवार दिनांक ३ रोजी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास अंगावर वीज पडून जागीच ठार झाला.

  सदर शेतकरी ज्ञानदेव धनु चौधरी( वय ६० )जागीच ठार झाल्याने आमोदा गावात शोककळा पसरली आहे.

आमोदा येथे शेतात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू


             सविस्तर वृत्त असे की आमोदा येथील रहिवासी ज्ञानदेव धनु चौधरी शेतकरी आपल्या खाजगी शेतात आमोदा शिवारात ( बकाने )पिकाची मशागत करत असताना अचानक ढगांचा व विजांचा कडकडाट होऊन एक ते दोन वाजेच्या सुमारास अंगावर वीज पडून जागीच ठार झाला. शेतकरी आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्याने मुले बाळे उघड्यावर पडले आहे तरी त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

           या शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,आई,वडील असा परिवार आहे.फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सानप यांनी पंचनामा केला शेतकऱ्याला व कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी परिसरातून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.