Contact Banner

आमोदा येथील हनुमान मंदिरात चोरी - पितळी घंटा व समई चोरीला गेल्या महिन्यातील परिसरात दुसरी घटना...

 

Theft-in-Hanuman-temple-at-Amoda-Brass bell and samai stolen-second-incident-in-the-premises-in-the-past-month...

आमोदा येथील हनुमान मंदिरात चोरी -  पितळी घंटा व समई चोरीला गेल्या महिन्यातील परिसरात दुसरी घटना...


लेवाजगत न्यूज आमोदा :-  यावल तालुक्यात आमोदा येथे चोरट्यांनी विरोदा रोड येथील हनुमान नगर मधील हनुमान मंदिर फोडून मंदिरातील पितळी घंटे,समई,व इतर भांडी असा हजारोंचा ऐवज चोरून नेला.

ही घटना (दि २ ऑगस्ट) रोजी रात्रीच्या सुमारास घडली. दिवसेंदिवस आमोदा परिसरात चोरीच्या घटना वाढत आहे.हनुमान नगर परिसरातील विरोदा  रोड येथे  हनुमान मंदिर आहे. या मंदिरात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करून या मंदिरातील पितळी घंटे, मोठ्या समई, काही भांडी असे साहित्य चोरून नेले.सकाळी भाविक मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याच महिन्यात ही चोरट्यांनी या परिसरातुन कापणीला आलेले केळी घड लांबविले होते. परिसरात दिवसेंदिवस कृषी साहित्य, केबल, मंदिरातील चोऱ्या वाढल्या असल्याचे चित्र दिसत आहे.आता तरी पोलीस प्रशासनाने वाढत्या चोरीच्या घटनांकडे लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातून होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.