डायमंड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये CA पास जाफर व अरबाज यांचा सत्कार उत्साहात
डायमंड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये CA पास जाफर व अरबाज यांचा सत्कार उत्साहात
लेवाजगत न्यूज सावदा -येथील मस्कावद रोडवरील डायमंड इंग्लिश स्कूल मध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये सावदा शहरातून दोन युवक चार्टर्ड अकाउंटंट ही परीक्षा पास झाल्याने त्यांचा संचालक ,शिक्षक ,पालक यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्या युवकांची नावे जाफर हुसेन हाजी शब्बीर हुसेन बोहरी व अरबाज शेख सलीम शेख असे हे युवक चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत पास झाले असून सावदा शहराचा मान यांनी उंचावला आहे. अशा शब्दात मान्यवरांनी त्यांना पुढील आयुष्यात असेच यशस्वी व्हा असे शुभेच्छा दिल्या .
यावेळी डायमंड ग्रुपचे संचालक हाजी हारून शेख इकबाल शेख यांनी सांगितले की आपल्या समाजात शिक्षणाला महत्त्व देऊन शिक्षणाची पंढरी आपल्या घरात आणावी शिकल्याशिवाय जगात कुठेही स्थान नाही तरी सर्व गरीब श्रीमंतांनी या शाळेत एकत्र येऊन शिकण्याचे त्यांनी प्रत्येकाला आवाहन केले.
मुख्यधिकारी किशोर चव्हाण म्हणाले की आपल्या शहरात डायमंड संस्था ही उर्दू माध्यमांमध्ये व इंग्लिश माध्यमातून शिक्षण देणारी एक संस्था असून प्रत्येक व्यक्तीने आपल्या पाल्याला या शाळेत शिक्षणासाठी पाठवावे. शिकल्याशिवाय प्रगती नाही शिक्षण ही वाघाचे दूध असून आपण वाघासारखे जगा आणि आपण जेव्हा जगू शकू जेव्हा आपल्या शिक्षणाची शिक्षण घेतलेली ताकद आहे त्या ताकदीचा उपयोग आपण कुठेही करू शकतो त्यातूनच आपले प्रगती होते असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी उपस्थितहाजी अजमल शेख इकबाल शेख ,अब्दुल राजीक,तफज्जूल शेख,रऊफ शेख माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे राजेंद्र चौधरी मुख्याधिकारी किशोर चव्हाण ,जिल्हा बँकेचे संचालक नंदू महाजन, गजाभाऊ ठोसरे ,नेहा गाजरे, मीनाक्षी कोल्हे, सिमरन वानखेडे, सलीम शेखसूरज परदेशी इत्यादी मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने महिला पालक वर्ग उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत