मा.लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी, फैजपूर मध्ये क.ब.चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मार्फत होणाऱ्या औषधनिर्माणशास्र शाखेच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुकी बाबत प्राचार्याची सहविचार सभा संपन्न.
मा.लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी, फैजपूर मध्ये क.ब.चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मार्फत होणाऱ्या औषधनिर्माणशास्र शाखेच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुकी बाबत प्राचार्याची सहविचार सभा संपन्न.
लेवाजगत न्यूज सावदा -क.ब.चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या मार्फत होऊ घातलेल्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुकी संदर्भात दिनांक १६/०८/२०२२ मंगळवार रोजी मा.लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी फैजपूर येथे विद्यापीठ संलग्नित औषधनिर्माणशास्र महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापकांची सहविचार सभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.आर .पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या सभेत विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर निवडून येण्यासाठी लागणाऱ्या निकषाची माहिती देण्यात आली जेणेकरून होऊ घातलेल्या निवडणुका सुरळीत पार पाडण्यास मदत होईल. सदर सभेस सुमारे १५ औषधनिर्माणशास्र महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रतिनिधी उपस्थित होते. सदर सभेची सांगता मा.आमदार व तापी परिसर विद्या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री.शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्राप्त डॉ.एस.बी.बारी, एच आर पटेल महाविद्यालय शिरपूर व आर.सी.पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जे.सुराणा यांच्या महाविद्यालयास यु.जी.सी. नवी दिल्ली यांच्या मार्फत स्वायत्तता मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच सभा संपल्यानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत