समाजसेवक डॉ रविंद्र भोळे ह्यांचे हस्ते ध्वजारोहण
समाजसेवक डॉ रविंद्र भोळे ह्यांचे हस्ते ध्वजारोहण
लेवाजगत न्यूज पेरणे फाटा ता शिरुर:-भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात पेरणे फाटा येथे चंद्रप्रकाश धोका निवासी मतिमंद विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला.ह्या वेळी मान्यवरांच्या उपस्तितीत जेस्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे ह्यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.ह्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरा समवेत कारगील युद्धाचे साक्षीदार ज्योती शर्मा,जेस्ठ पत्रकार वीजय अंबाडे दै .समाचार पिंपरी चिंचवड,उद्योजक राहुल सोनवणे,जगदीष तिखे उपसरपंच वाजेवाडी शिरुर उपस्थीत होते.कार्यक्रमाचे आयोजन श्री राम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष कट्यारमल यांनी केले.
तसेच ह्या प्रसंगी डॉ.रविंद्र भोळे अध्यक्ष डॉ.मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट निती आयोग सल्ग्नीत संस्थेच्या वतीने आरोग्य तपासणी व खाऊ वाटप करण्यात आले.डॉ रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्र उरुळीकांचन येथेही डॉ रविंद्र भोळे ह्यानी मान्यवरांच्या उपस्थितीत झेंडावंदन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत