Header Ads

Header ADS

मुकेश अंबानींना पुन्हा धमकी:3तासांत अख्खे कुटुंब संपवून टाकू

Mukesh-Ambani-threatened-again-to-finish-the-entire-family-within-3-hours


मुकेश अंबानींना पुन्हा धमकी:3तासांत अख्खे कुटुंब संपवून टाकू

वृत्तसंस्था मुंबई -रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांना पुन्हा जिवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. 

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या डिस्प्ले नंबरवर धमकीचे ८फोन कॉल आले होते. फोन करणाऱ्या व्यक्तीने तीन तासांत संपूर्ण कुटुंबाला ठार करण्याची धमकी दिली. यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

  या तक्रारीनंतर अंबानींच्या कुटुंबीयांची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलकडून तक्रार मिळाल्याला दुजोरा दिला आहे. या तक्रारीत मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना तीनहून अधिक धमकीचे फोन आल्याचा उल्लेख आहे.

   एकाच कॉलरने ८वेळा केला कॉल

   पोलीस या कॉल्सची पडताळणी करत आहेत. कॉलर एकच असून त्याने सलग ८ कॉल केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणाची माहिती मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत.

     नोव्हेंबरमध्ये अँटिलियाजवळ सापडली होती स्फोटकांनी भरलेली कार

    याआधी नोव्हेंबर २०२१ मध्ये मुकेश अंबानींच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांचे एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचे नाव पुढे आले आहे. एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहे.

    मुकेश अंबानी यांना Z+ सुरक्षा

    मुकेश अंबानी यांना हिजबुल मुजाहिद्दीनकडून धमक्या आल्यानंतर २०१३मध्ये तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने Z+ सुरक्षा प्रदान केली होती. त्यांची पत्नी नीता अंबानी यांना २०१६ मध्ये केंद्र सरकारने Y+ सुरक्षा प्रदान केली होती. त्यांच्या मुलांनाही महाराष्ट्र सरकारकडून दर्जेदार सुरक्षा दिली जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.