सावद्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांना पोलीस विशेष सेवा पदक
सावद्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांना पोलीस विशेष सेवा पदक
लेवाजगत न्यूज सावदा -नवी दिल्ली येथिल भारत सरकार, गृह मंत्रालय च्या आदेशाने जळगाव जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दिनांक १५ ऑगस्ट २०२२ स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवत्तापुर्ण सेवेबद्यल पोलीस पदक जाहीर झालेले आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दि.१५/०८/२०२२ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड चंद्रपूर येथे सेवेत असतांना विशेष कामगिरी बजावल्या बद्दल भारत सरकार तर्फे महाराष्ट्र पोलीस विशेष सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यांना आज स्वातंत्र्य दिनी पुष्पगुच्छ व पोलीस पदक बहाल करण्यात आले .
यावेळी इतर पोलीस पदक प्राप्त अधिकारी व कर्मचारी १. श्री. प्रदीप पंढरीनाथ चांदेलकर, पोलीस उप निरीक्षक, पो. ठाणे जिल्हापेठ जि. जळगांव २. श्री. मानिक सोनजी सपकाळे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक पोलीस ठाणे जळगांव तालुका जि. जळगांव ३. श्री. विजय देवराम पाटील सहाय्यक पो. उप निरीक्षक पोलीस ठाणे जळगांव तालुका जि. जळगांव ४. श्री. प्रदीप राजाराम चिरमाडे वाचक सहाय्यक पो. उप निरीक्षक मोटार परिवहन शाखा, जळगांव.श्री. सुरेश पंडीत पाटील हेड कॉस्टेबल १६६ अॅन्टी करप्शन ब्युरो, जळगांव -घटक विशेष सेवा पदक प्राप्त झालेले अधिकारी १. श्री. समाधान रामकृष्ण गायकवाड पोलीस उप निरीक्षक पो. ठाणे सावदा, जि. जळगांव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत