Header Ads

Header ADS

पनवेल येथे नेचर फ्रेंड्स तर्फे सर्प आणि सर्पदंश या विषयावर मार्गदर्शन

पनवेल येथे नेचर फ्रेंड्स तर्फे सर्प आणि  सर्पदंश या विषयावर मार्गदर्शन


पनवेल येथे नेचर फ्रेंड्स तर्फे सर्प आणि  सर्पदंश या विषयावर मार्गदर्शन 


उरण (सुनिल ठाकूर )१५ऑगस्ट २०२२रोजी उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे स्वातंत्र्य अमृत  महोत्सव निमित्त  नेचर फ्रेन्ड सोसायटी पनवेल या संस्थे कडून सर्प आणी सर्पदंश या विषयावर जनजागृती  कार्यक्रम पार पडले.या कार्क्रमाला  उपस्थित डॉ. सचिन संकपाल (वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय पनवेल ) श्री. उल्हास ठाकूर (सर्पतज्ञ) श्री. संतोष उदरे (अध्यक्ष - नेचर फ्रेंड सोसायटी ) तसेच प्रमोद पाटील, लोकेश फडके, संदेश पवार, आर्यन उदरे, दिपक उदरे आणी प्राजक्ता सागडे उपस्थित होते. 

     उपजिल्हा रुग्णालय पनवेल मधील डॉक्टर आणि इतर कर्मचारी यांना सर्प जनजागृती आणि सर्पदंश या विषयावर PPT. द्वारे सविस्तर माहिती देण्यात आली..

तसेच संस्थे कडून उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे डॉक्टर् आणि आलेल्या पेशंट त्यांच्या नातेवाईकांना आपल्या परिसरात आढळणाऱ्यास सापांची ओळख व्हावी म्हणून ओ पी डी वार्ड मध्ये विषारी, निमविषारी, बिनविषारी सापांचे चित्र आणि त्यांचे इंग्लिश आणि मराठीत नाव असलेले विनाइल फोम शीट बॅनर लोकार्पण करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.