Header Ads

Header ADS

आमोदा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

Amoda-celebrates-the-Nectar-festival-of-independence-here


आमोदा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

लेवाजगत न्यूज आमोदा ता. यावल-भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75 वर्षाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांपासून ते आबाल वृद्धांपर्यंत सर्व सहकारी संस्थांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला

             देशाला स्वातंत्र्य मिळवून देशासाठी लाखो लोकांनी संघर्ष केला या शूरवीरांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यांच्या त्या संघर्ष बलिदानामुळे मिळालेल्या स्वातंत्र्यप्राप्तीतील ७५वर्षे पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने आमोदा ग्रामपंचायत येथे दिनांक १५ऑगस्ट रोजी सरपंच हसीना तडवी यांनी झेंडावंदन केले त्याप्रसंगी ग्रामसेवक डी डी पाटील, तलाठी महिंद्र खुर्द सर्व ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील तुषार चौधरी , वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अतुल वायकोळे , विद्युत मंडळ अधिकारी श्री भंगाळे सर्व नागरिक शालेय विद्यार्थी सर्व शिक्षक  कर्मचारी उपस्थित होते

   घ.का.विद्यालय व भजनी मंडळ व महिला भजनी मंडळ आमोदा यांनी प्रभात फेरीमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला

           घ.का. विद्यालय मध्ये संस्थेचे अध्यक्ष उमेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण केले.त्याप्रसंगी चेअरमन ललीत महाजन विद्यालयाचे सदस्य प्रमोद वाघुळदे व सर्व कार्यकारणी सदस्य  संपूर्ण गावांमधून प्रभात चे नियोजन श्री संजीव बोथे सर व शिक्षक वर्ग व कर्मचारी रुंद यांच्यामार्फत केले.त्यांमध्ये भारत मातेचा रथ व त्यावर सर्व नेत्यांच्या प्रतिकृती साकार केलेल्या होत्या तसेच मुलींच्या लेझीम पथकांचे विशेष आकर्षण होते प्रभात फेरी मागे गावातील भजनी मंडळ व महिला भजनी मंडळ नरेंद्र पाटील व अशोक लोखंडे लक्ष्मण चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये अभंग म्हणत शोभा वाढवली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.