साई देवस्थान वहाळ ने केला कला सागर परिवाराचा सन्मान.
साई देवस्थान वहाळ ने केला कला सागर परिवाराचा सन्मान
लेवाजगत न्यूज उरण (सुनिल ठाकूर ):- वेश्वी येथील माजी सरपंच त्रिंबक शेठ मुंबईकर यांचा कलेचा वारसा जपत श्री श्रीकांत मुंबईकर यांच्या कला सागर या निर्मिती क्षेत्राला 32 वर्ष पूर्ण झाली. श्रीकांत मुंबई यांच्या या कला सागर मध्ये सिने कलाकार कमलाकर वैशनपायन. राजा मयेकर. पासून सिने कलाकारांची सुरवात होऊन आताचे अरुण कदम. भूषण कडू. विकास समुद्रे. जॉनी रावत. मनोहर कोळंबे. गायक जगदीश पाटील. योगेश आग्रावकर. भारती मढवी. डी महेश. प्रशांत शिंदे अशा कलाकारांचा समावेश आहे.
श्रीकांत मुंबईकर यांच्या कला सागर ची सेवा साई मंदिर वहाळ येथे सतत असल्याने या सेवे बद्दल श्री साई देवस्थान तर्फे गुरुवारी साई मंदिरात त्यांना साई देवस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष श्री रवीशेठ पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी साई देवस्थान वहाळ चे अध्यक्ष श्री रवीशेठ पाटील. माजी . जि. प. सौ. पार्वती ताई पाटील. जगन शेठ पाटील. सावरोली चे माजी सरपंच श्री प्रवीण वाघमारे.. विश्वास पाटील. एकनाथ ठाकूर. राजू मुंबईकर. सुयोग् खरे आदी सह साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत