मुकूंदपाडा एक दुर्लक्षित गाव बेधडक रोखठोक आदिवासी संघाच्या उपस्थितीत जागतिक आदिवासी दिन साजरा
मुकूंदपाडा एक दुर्लक्षित गाव
बेधडक रोखठोक आदिवासी संघाच्या उपस्थितीत जागतिक आदिवासी दिन साजरा
लेवाजगत न्यूज मोखाडा:-मुंबई पासून १५० किलोमीटर अंतरावर वसलेल हे गाव पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात बेरीस्ते ग्रामपंचायत मध्ये एक छोटेसे गाव ज्या ठिकाणी जाण्यासाठी ना रस्ता+पूल ,जायचं म्हटलं तर जीव धोक्यात घालून नदी ओलांडून जावे लागते या गावात दळण-वळणासाठी कुठलाही पर्याय नाही.
पावसाळ्यात गावकरी जीव मुठीत धरून पाण्यात पोहून नदी पार करून जातात नशीब असले तर नदी पार करुशकतो नाहीतर मृतदेह सुद्धा सापडत नाही अशी अवस्था या गावातील राहणाऱ्या लोकांची आहे . (खरतर मुकुंदपाडा या गावात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला पोहता येणे हे अनिवार्य आहेच.)
एकीकडे देशात हर घर झेंडा असा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे तर एकीकडे देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदी आदिवासी द्रौपदी मुर्मु यांना नेमण्यात आल आहे तर दुसरीकडे आदिवशिंच्या जीवनाची त्यांच्या सोई सुविधांची हेळसांड चालू आहे.स्वातंत्र्य मिळवून देशाला ७५ वर्ष होत आहेत तरी सुद्धा आदिवासींना सोई सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे ही खूप एक चिंताजनक व धक्का दायक बाब आहे.
ह्या गावाची व्यथा म्हणजे जर कोणी आजारी पडल्यास त्याला दवाखान्यात न्यायचे म्हटले तर त्याला डोली करून न्यावे लागते, आणि पावसाळ्यात तर यांना पाऊस सुरू असल्या मुळे व नदीला पूर आल्या मुळे कोणत्याच प्रकारची आरोग्य सुविधा मिळत नाही .मुलांना शाळा आहे पण शिक्षक नाही कोणता शिक्षक आपला जीव धोक्यात घालून ह्या गावी शिकवायला जाईल असेच चित्र गेल्या अनेक वर्षांपासून दिसते.
मुंबई ला पाणीपुरवठा करण्यासाठी १००-१५० किलोमीटर अंतरावर डोंगर दऱ्यांमध्ये मोठमोठे प्रकल्प केले जातात परंतु मुकुंदपाडा गावात जाण्यासाठी साधा रस्ता+पूल बनवता आला नाही किंवा गावात आता पर्यंत निवडून दिलेल्या पैकी कोणताच लोकप्रतिनिधी आला नाही.
अश्याच या दुर्लक्षित गावात बेधडक रोख ठोक आदिवासी संघाने व प्रशासक तुषार सूर्यवंशी यांने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याचा निर्णय हाती घेतला व तो पूर्ण केला या वेळेस आदिवासी नृत्य आदिवासी पारंपरिक वेशभूषा आदिवासी कला असा प्रदर्शन सोहळा पार पाडण्यात आला या कार्यक्रमात ग्रामस्थांनी खूप हौशीखुषीने सहभाग घेतला या वेळी पंचायत समिती मोखाडा विस्तार अधिकारी श्री तुषार सुर्यवंशी पत्रकार अमोल टोपले इंजिनिअर अनिकेत कदम,सुनील मौळे, किशोर मौळे,पळसुंडा पी आर टिशी चे प्राध्यापक तुंबडा सर बेधडक रोखठोक आदिवासी संघाचे सरचिटणीस गजानन टोपले,चंदर राऊत,प्रवीण मौळे,विजय टोपले,योगेश टोपले,पोपट तुंबडे,नरेश भोये,जयराम भोये,भास्कर राऊत,आदी पदाधिकारी व गावकरी महिला वर्ग छोटे मोठे कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत