सावदा शहरातील हा भाग वीस वर्षापासून विकासकामांपासून वंचित का-रहिवासी नागरिकांना प्रश्न
सावदा येथील निमजाय माता नगर वीस वर्षापासून विकासकामांपासून वंचित
लेवाजगत न्यूज सावदा - शहरातील बाजार समिती मागील. निमजाय माता नगर परिसर गेल्या २० वर्षापासून रहिवाशी नागरिक रहात असलेली सर्वात आधी झालेली ही कॉलनी विकासापासून वंचित आहे. हा भाग आधी हद्दी बाहेर होता.तर दोन वर्षा पासून हा परिसर पालिका हद्दीत आला आहे .
बाजार समिती मागील निमजाय माता नगर या परिसरात सन २००२पासून रहिवासी घरे अस्तित्वात असून या परिसरास २० वर्ष पूर्ण होत आहे.
पालिका हद्दीच्या व महामार्गाच्या जवळच असलेल्या हा बाजार समिती मागील परिसर , हा भाग अजूनही विकास कामांपासून वंचित असल्याने हा परिसर का वंचित आहे असा प्रश्न या परिसरात राहणाऱ्या रहिवाशी नागरिकांना पडला आहे. या परिसरात घाण पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार,सिमेंट काँक्रीट रस्ते,डांबरी रस्ते ,दिवाबत्ती व इतर सुख सुविधा उपलब्ध नाही.परिसरातील नागरीक मनात विचार करीत आहे की आपला भाग सर्वात जुने असून सुद्धा या परिसरात विकास कामे का होत नाही .लोकप्रतिनिधी आणि पालिकेने गांभीर्याने या परिसराकडे लक्ष घालून या परिसरात विविध विकास कामे व सुविधा परवाव्या अशी या परिसरातील नागरिक आशा बाळगून आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत