Contact Banner

घर घर तिरंगा या मोहीमेची डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल येथे पालिका मुख्याधिकारी यांनी केली जनजागृती

घर घर तिरंगा या मोहीमेची डायमंड  इंग्लिश मीडियम स्कूल येथे पालिका मुख्याधिकारी यांनी केली जनजागृती



घर घर तिरंगा या मोहीमेची डायमंड  इंग्लिश मीडियम स्कूल येथे पालिका मुख्याधिकारी यांनी केली जनजागृती


लेवाजगत न्यूज सावदा - सावदा नगर परिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण व (लेखापाल) विशाल पाटील यांनी सुप्रसिद्ध डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज  येथे भेट देऊन येथील विद्यार्थ्यांना घर घर तिरंगा मोहीम बद्दल माहिती दिली.याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील यास चांगला प्रतिसाद दिला.    

       यानंतर येणार्‍या स्वातंत्र दिवसाच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी उपस्थित विद्यार्थ्याकडून माहिती जाणून घेतली.यावेळी डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलचे सचिव व उद्योजक डॉ.हाजी हारून शेख  यांनी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. त्यावेळी प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी सह मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.