सावद्यात "हर घर तिरंगा" जागृती साठी विद्यार्थ्यानी काढली रॅली । पथनाट्याने वेधले नागरिकांचे लक्ष
सावद्यात "हर घर तिरंगा" जागृती साठी विद्यार्थ्यानी काढली रॅली । पथनाट्याने वेधले नागरिकांचे लक्ष
लेवाजगत न्यूज सावदा - सावदा पालिकेच्या वतीने हर घर तिरंगा अभियान उत्स्फुर्तपणे राबविण्यात येत असून याअंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहे. येथील पालिका संचालित श्री. आ.गं .हायस्कूल,व ना.वि.ह. कन्या शाळा येथे समूह गीत गायन, रांगोळी अश्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
याच अभियान अंतर्गत ११ रोजी शहरातील स्टेशन रोड वर असलेल्या श्री .आ.गं .हायस्कुल पासून दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यानी शहरातून भव्यअशी विविध वेशभूषा करून रॅली काढली यात विद्यार्थी यांनी विविध देशभक्तीपर वेशभूषा करीत तसेच देशभक्तीपर घोषणा दिल्या ठीक ठिकाणी ह्या रॅलीचे स्वागत नागरिकांनी केले.
याच रॅलीत विद्यार्थ्यानी शहरात ठिकठिकाणी देशभक्ती पर पथनाट्य देखील सादर केले.यात त्यांनी देशभक्ती तसेच हर घर तिरंगा याबाबत अप्रतिम सादरीकरण करीत नागरिकांची मने जिंकली.यावेळी पालिका मुख्याधिकारी किशोर चव्हाण, कार्यालय अधीक्षक सचिन चोळके, मुख्याध्यापक सी.सी.सपकाळे, लेखापाल विशाल पाटील, मुख्याधिकारी किशोर चौहान,प्राचार्य सी.सी.सपकाळे ,पर्यवेक्षक जे व्ही तायडे,अनिल नेमाडे ,एम आय.तडवी सर, बी जी लोखंडे ,कल्पना शिरसाठ, प्रणाली काटे इत्यादी उपस्थीत होते. ,लिपिक सतीश पाटील, किरण चौधरी, आकाश तायडे यांचे सह शिक्षवृंद, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत