महिलेचा पैशासाठी छळ
महिलेचा पैशासाठी छळ
यावल प्रतिनिधी-शहरातील माहेर असलेल्या १९ वर्षीय विवाहितेस लग्नात तुझ्या वडिलांनी पैसे दिले नाही, असे सांगत पतीसह सासरच्या चौघांनी तिचा पैशांसाठी छळ केला. तसेच तिच्यावर संशय घेत शारीरिक व मानसिक त्रास दिला म्हणून पतीसह चौघांविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल येथील माहेर असलेल्या पूनम सागर नन्नवरे या विवाहितेने याप्रकरणी फिर्याद दिली.
त्या नुसार तिचे पती सागर भगवान नन्नवरे, सासरे भगवान दगा नन्नवरे, सासू जनाबाई भगवान नन्नवरे व संदीप भगवान नन्नवरे, सर्व रा. रवंजे, ता. एरंडोल या चौघांनी विवाहितेला तुझ्या वडिलांनी लग्नात पैसे दिले नाही असे सतत बोलून तिला त्रास देत छळ केला. तसेच तिच्यावर संशय घेत तिचा वेळोवेळी छळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणी येथील पोलिसांत या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत