स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने आमोदा येथे मोफत राष्ट्रीय तिरंगा ध्वज वाटप...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने आमोदा येथे मोफत राष्ट्रीय तिरंगा ध्वज वाटप...
लेवाजगत न्यूज आमोदा ता यावल- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त उमेश पाटील उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यावल यांच्या वतीने आमोदे येथे मोफत राष्ट्रीय तिरंगा ध्वज वाटप करण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाला उदंड प्रतिसाद मिळतोय आमोदे गावात याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
याप्रसंगी कृ.उ.बा.स.उपसभापती उमेश पाटील , जेष्ठ नागरिक हरी(गुरुजी) पाटील , घ.का.विद्यालय चेअरमन ललित महाजन, RTI यावल तालुका अध्यक्ष चेतन चौधरी, भा.ज.पा. युवा मोर्चा चिटणीस सचिन चौधरी, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद वाघूळदे ,निलेश पाटील, हितेंद्र महाजन सुभाष महाजन हेमंत चौधरी. उपस्थित होते.
यासाठी प्रसाद चौधरी, हेमंत पाटील, योगेश चौधरी, पुष्पक सरोदे, कमलेश पाटील व समस्त तरुण मित्र मंडळी व गावकरी यांचे अनमोल सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत