Contact Banner

फैजपूर येथे चित्र रथ यात्रा गुरुवार रोजी सकाळी

फैजपूर येथे चित्र रथ यात्रा गुरुवार रोजी सकाळी


फैजपूर येथे चित्र रथ यात्रा गुरुवार रोजी सकाळी 

लेवाजगत न्यूज फैजपूर:-दिनांक 22/09/2022 गुरुवार रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव,विद्यार्थि विकास विभाग आणि धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमा अंतर्गत दिनांक 22/09/2022 गुरुवार रोजी 'चित्र रथ यात्रा' आयोजित करण्यात येणार आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष तापी परिसर विद्या मंडळ, फैजपूर.संस्थेचे अध्यक्ष रावेर विधानसभेचे सन्मा.आमदार शिरीष दादा चौधरी, तसेच उद्घाटन डॉ.विनोद पाटील, कुलसचिव, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व श्री.देविदास इंगोले, सहा.पोलिस निरीक्षक, सावदा पोलिस स्टेशन यांच्या हस्ते होईल, यात्रेची सुरुवात गुरुवारी दि. 22/09/2022 रोजी सकाळी 7:30 वाजता धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील प्रेरणा स्तंभ पासून होईल ती पुढे फैजपूर शहरात सुभाष चौक, म्युनिसिपल हायस्कूल,खंडेराव वाडी,मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल ते कुसुमताई विद्यालय या मार्गाने परत धनाजी नाना महाविद्यालय येथे समारोप होईल या चित्र रथ यात्रेत ऐतिहासिक वास्तू, घटना, उपक्रम, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आंदोलने, स्वातंत्र्याचा इतिहासाबद्दल जाणीव जागृती करणाऱ्या अनेक गोष्टींचे  चित्र रूप  पाहायला मिळणार आहे तरी परिसरातील नागरिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य.डॉ.पी.आर.चौधरी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.