सावदा दूध उत्पादक संस्था देणार लाभांश सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न, साडेबारा लाखांचा फरकही होणार वाटप
सावदा दूध उत्पादक संस्था देणार लाभांश
सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न, साडेबारा लाखांचा फरकही होणार वाटप
लेवाजगत न्यूज सावदा -येथील सावदा सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित ची ४४ वी सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन रवींद्र श्रावण बेंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली डेअरीच्या मुख्य हॉलमध्ये नुकतीच संपन्न झाली.संस्थेस सतत अ वर्ग ऑडिट अहवाल मिळत आहे. यावेळी संस्थेचे सचिव पितांबर बोंडे यांनी अहवाल वाचन केले.सभेत सर्वात जास्त गाई व म्हशीचे दूध पुरवठा करणारे पाच पाच सभासदांचे रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. यात म्हशीचे दुधाचे सर्वात प्रथम क्रमांक संजय वामन नेहते १८ हजार लिटर , विनय नामदेव बढे १६ हजार लिटर, जोष्णा नरेंद्र बोंडे१५ हजार लिटर ,संदीप अनिल राणे ९हजार लिटर, विकास कृष्णा पाटील सात हजार लिटर असे अनुक्रमे पाच रोख बक्षिसे देण्यात आली. तर गाईचे दूध पुरवठा करणारे राकेश मुरलीधर बडे२८ हजार लिटर, मिलिंद सुरेश पाटील २३ हजार लिटर, गोविंदा कृष्णा महाजन २३ हजार लिटर, जगदीश लहू बढे १९ हजार लिटर, देवानंद नामदेव बडे १८ हजार लिटर असे एकूण गाई व म्हशी मिळून दहा सर्वात जास्त दूध उत्पादक करणाऱ्या सभासदांना जेष्ठ सभासद बाळू भानुदास पाटील यांचे हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.
सभेस एकूण बारा विषयांना मंजुरी देण्यात आली त्यात सर्व सभासदांना १० टक्के डिव्हीडंट व ६० टक्के बोनस देण्याची घोषणा व म्हशीच्या दुधाला लिटरला ४ रुपये ७० पैसे तर गायीचे दुधाचे पुरवठा करणाऱ्या उत्पादकास १रुपया ४० पैसे असे ऐकून बारा लाख ६० हजार रुपये दूध भाव फरक वाटप करणार असल्याचे चेअरमन यांनी सांगितले.
किरकोळ सूचना वगळता सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन देवानंद नामदेव बढे,जगदीश लहू बढे,धनंजय वासुदेव चौधरी, संजय रामचंद्र चौधरी, किरण जनार्दन पाटील ,भरत वसंत नेहते, विकास किसन चौधरी, रवींद्र बळीराम नेमाडे,परेश पितांबर झोपे ,परीक्षित शरद वाणी, सर्व संचालक उपस्थित होते.सभा यशस्वीपणे पार पद्मा साठी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत