महिलांसाठी मोफत गरबा दांडिया प्रशिक्षण:एकता महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सारिका पवार -शास्त्रडान्स अकॅडमी चे संचालक शुभम परदेशी व दीपक कुमार : यांच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला.
महिलांसाठी मोफत गरबा दांडिया प्रशिक्षण:एकता महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सारिका पवार-
शास्त्रडान्स अकॅडमी चे संचालक शुभम परदेशी व दीपक कुमार : यांच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला
चिखली, दि. २५ (लेवाजगत वार्ताहर) - नवरात्रोत्सवानिमित्त पूर्णानगर, संभाजीनगर, शाहूनगर, शिवतेजनगर परिसरातील महिलांसाठी एकता महिला प्रतिष्ठानच्या वतीने मोफत गरबा, दांडिया प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिराला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
एकता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सारिका पवार यांच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला. आठ दिवस चाललेल्या या प्रशिक्षणास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रशिक्षणामध्ये महिलांना बॉलीवूड गरबाचे प्रशिक्षण देण्यात आले. या पाच ते सहा दिवस चाललेल्या प्रशिक्षणाची सांगता बक्षीस वाटप करून.
झाली. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर मंगला कदम व महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, युवक शहर उपाध्यक्ष योगेश मोरे, शहर वाहतूक संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ जगताप, शहर उपाध्यक्ष सुनील कदम उपस्थित होते. माजी महापौर मंगला कदम व शहराध्यक्ष गव्हाणे यांनी सारिका पवार यांच्या कार्याचे कौतुक केले. रुपाली पवार यांनी सूत्रसंचालन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत