नारी नव्हे नारायणी...!पूजाताई नितीन खडसे
नारी नव्हे नारायणी...!पूजाताई नितीन खडसे
पांडुरंग बहुद्देशीय सेवाभावी संस्था संस्थापिका, अध्यक्षा, दोंडाईचा ता. धुळे
भारत हा जगातील सर्वात पवित्र देश तथा विश्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखला जातो. त्या सोबतच नवदुर्गेची पूजा करणाऱ्या भारतीय संस्कृतीतील आदिशक्ती म्हणून स्त्री शक्तीचा कौतुकमिश्रित गौरव करून सन्मान केला जातो. विशेषता नवरात्रोत्सवात किंवा महिलादिनी तर स्त्री सामर्थ्याचा अभूतपूर्व जागर होत असतो. समाजासाठी झटणाऱ्या माता भगिनी ह्या कलियुगातील एक प्रकारे नवदुर्गेचा आवतर असलेल्या पांडुरंग बहुद्देशीय सेवाभावी संस्था संस्थापिका, अध्यक्षा पूजाताई खडसे ह्यांची समाजाप्रती तळमळ आणि धुळे, दोंडाईचा परिसरातील असंख्य महिलांना रोजगारांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पूजाताई खडसे यांचे कार्य अभिमानास्पद आहे.
महिला स्श्कातिकरण हा जागतिक विषय आहे परंतु ह्याची सुरुवात आपण घरातून करयला हवी, एक लक्षात ठेवा की स्त्रीला शारीरिक, मानसिक व सामाजिक रित्या मजबूत करणे हे काम घराघरातून व्हायला हवे. महिला विकास होण्यासाठी एका विकसित आणि पुरोगामी कुटुंबांची गरज आहे. महिला सशक्तकरण होण्यासाठी मुलींचे महत्त्व व त्यांचे शिक्षण ह्याला महत्त्व द्यायला हवे, ह्याचबरोबर स्त्रीविषयी आपले विचार उच्च हवेत.
हेच उद्देश समोर ठेवून घरोघरी जाऊन महिला सक्षमीकरण करण्याचे काम त्या त्यांच्या भागातून करतात
पूजाताईचे माहेर डोंबिवली येथील असून श्री अविनाश नामदेव जावळे मूळचे भलोदचे सध्या वास्तव्य डोंबिवली (डेप्युटी म्युनिसिपल चीफ ओडिटर) उपमुख्य लेखा परीक्षक म्हणून रिटायर ,बृहन्मुंबई महानगरपालिका ह्यांच्या त्या कन्या, त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे डोंबिवली तसेच मुंबई मध्येच पार पडले. त्यांनी डिप्लोमा इन इंटेरिअर डिझाइनर अँड डेकोरेशनचे शिक्षण पूर्ण केले . त्याच दरम्यान पूजा यांचा विवाह मुक्ताईनगर तालुक्यातील (कोथळी) येथील नितीन खडसे यांच्याशी झाला. त्यांचे पती नंदुरबार गेट पाटबंधारे विभाग मध्ये कार्यकारी अभियंता म्हणून सेवेत असल्याने त्यांना थेट दोंडाईचा येथे यावे लागले. त्यांचा दोडाईचा आणि धुळे शहराशी निकटचा परिचय झाला. लग्नानंतर मिस्टरांच्या पाठिंब्याने 'NIMISHA INTERIOR' सुरू केले , त्यांनी जे शिक्षण घेतले होते, त्या शिक्षणात करिअर करण्याच्या दृष्टीने धुळ्यात इंटेरिअर डिझायनरचे काम करण्याचा विचार करीत त्यांनी निमिषा इंटेरिअर या नावाने कामाचा श्रीगणेशा केला. त्यावेळी आसपासच्या भागात फारसे कुणी इंटेरिअर डिझाइनर अस्तीत्वात नव्हते . त्यामुळे ही संकल्पनाच फारशी रुजलेली नव्हती . मात्र त्याकडे संकट म्हणून न पाहता पूजाताई यांनी इंटेरिअर डिझायनरच्या कामकाजाला सुरुवात केली
लहानपणापासून पूजाताई यांना समाजसेवा करायला आवडते, त्यामुळे
पांडूरंग बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून धुळे, दोंडाईचा परिसरातील हजारो गरजूंपर्यंत पोहोचून त्यांना सामाजिक , आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्यांनी अनाथ मुले, गरजू महिला , विधवा महिलांना रोजगार मिळवून देणे, त्यांच्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला. महिला आणि मुलांशी निगडित कार्य असल्याने त्या कार्याकडे पूजा खडसे यांनी अधिक लक्ष दिले. समाजकार्य व समाजहित यासाठी सामाजिक बांधिलकी जपत लोकहितासाठी कार्य करण्यास त्या प्राधान्य देताना दिसतात .
त्यांच्या कार्याचा गौरव लोकमत तर्फे Womens acheivers अवॉर्ड २०२० ने सन्मानित करण्यात आले.
त्यांच्याच स्मरणार्थ त्यांच्याच प्रेरणेने आणि त्यांची आठवण म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने 'पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था' स्थापन करून समाज सेवेचे व्रत पूर्ण करण्याचे कार्य त्या करीत असतात. त्या अंतर्गत गरजू महिलांना रोजगार मिळवून देणे, अनाथ मुलांना गरज असेल तशी मदत करणे असे अनेक उपक्रम त्या राबवित असतात.
त्यांच्या कार्याला अजून प्रोत्साहन मिळाले ते ८ जानेवारी २०२० रोजी माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे आणि भारत भारत अस्मिता फौंडेशनचा ९ वा राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सन्माननीय श्री भगत सिंह कोश्यारी ह्यांच्या उपस्थितीत त्यांना गौरविण्यात आले.
तसेच कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे २०२२ मध्ये त्यांना अभिमान महाराष्ट्राचा,स्टार टाईम मीडिया तर्फे नॅशनल क्वालिटी सर्विस एक्सलन्स अवॉर्ड अशा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे
सामाजिक कार्याबद्दल मिळालेल्या या पुरस्काराने त्यांना कार्य करण्यासाठी बळ मिळाले आहे. व्यावसायिता आणि सामाजिकता अशा दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम त्यांनी साधला आहे. त्यांच्या यशस्वी कारकीर्दीचा आदर्श प्रत्येकाने ठेवायला हवा.
शब्दांकन-: खेमचंद पाटील (बदलापूर)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत