RSS सरसंघचालक मोहनभागवत यांनी मशिदीला भेट, राष्ट्रपिता आहेत मुस्लिमांचे गौरवोद्गार
RSS सरसंघचालक मोहनभागवत यांनी मशिदीला भेट,
राष्ट्रपिता आहेत मुस्लिमांचे गौरवोद्गार
वृत्तसंस्था दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (२२ सप्टेंबर) दिल्लीतील एका मशिदीला भेट दिली. भागवत यांनी यावेळी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर अहमद इलयासी यांचीही भेट घेतली. दोघांमधील बंद दाराआडची ही बैठक जळवपास एक तास चालली. दरम्यान, मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिल्यानंतर उमर अहमद इलयासी यांनी त्यांचा ‘राष्ट्रपिता’ म्हणून उल्लेख केला आहे.
Lewajagat online store ला भेट द्या.
https://sites.google.com/view/lewajagat-online-store/home
“मोहन भागवत यांना मी निमंत्रण दिले होते. माझ्या निमंत्रणानंतर ते आले होते. ते राष्ट्रपिता आणि राष्ट्रऋषी आहेत. त्यांच्या भेटीनंतर समाजात एक चांगला संदेश जाईल. देवाचे पूजन करण्याच्या आपल्या पद्धती वेगळ्या आहेत. मात्र मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे. देश सर्वप्रथम याला आम्ही महत्त्व देतो,” असे उमर अहमद इलयासी म्हणाले आहेत.
बातमी साठी व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक-https://chat.whatsapp.com/EEtClBe8u0eBKmm4lct2jX
सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील एका मशिदीला आज भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी काही लोकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर अहमद इलयासी यांची भेट घेत साधारण एक तास चर्चा केली.
हेही वाचा-महाराष्ट्रासाठी धक्कादायक बातमी ! 'वेदान्त - फॉक्सकॉन ' नंतर PhonePe चा राज्य सोडण्याचा निर्णय ; मुंबईतून कर्नाटकात हलवलं कार्यालय >>
या भेटीनंतर देशातील धार्मिक सौहार्द वाढवण्यासाठी सरसंघचालक मुस्लीम बुद्धीजीवींना भेटत असल्याचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सांगण्यात येत आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर म्हणाले, “सरसंघचालक मोहन भागवत अनेक लोकांना भेटत आहेत. हा सातत्यापूर्ण ‘संवाद’ प्रक्रियेचा भाग आहे.”

कोणत्याही टिप्पण्या नाहीत