अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिश दाखवून अपहरण करून अत्याचार
अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिश दाखवून अपहरण करून अत्याचार
वृत्तसंस्था जळगाव-मध्ये १२ वर्षीय मुलीला लग्नाचे आामिष दाखवून तिचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी मंगळवारी (११ ऑक्टोबर) संशयितावर भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. भावेश योगेश तायडे (वय १८) संशयित आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, संशयित आरोपी भावेश याने सर्वप्रथम २३ जुलै रोजी शाळेच्या गेटवर पीडित बालिकेस बोलावून तिची भेट घेतली. मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे सांगून तो तिला त्याच्या स्कुटीवर बसवून सात नंबर पोलिस चौकीच्या मागे पडीक रेल्वे क्वार्टरच्या रुममधे घेवून गेला. तू मला खुप आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे तिच्याशी गोड बोलून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पून्हा १९ ऑगस्ट रोजी त्याने तिला शाळेच्या गेटवर बोलावून स्कुटीवरून बसवून नेत जामनेर रोडवरील एका धार्मिक स्थळानजीक एका गार्डनमधे नेले. त्याठिकाणी देखील भावेशने पीडितेसोबत अंगलटपणा केला. तसेच गेल्या दोन महिन्यापासून सतत पीडितेचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवले. अपहरण करुन अत्याचार केले. हा प्रकार समोर आल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे.पीडित मुलीस पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.
यानंतर भावेशने पीडितेला तिचे घर सोडून त्याच्या घरी येण्यास सांगितले. त्यानुसार १० ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजता पीडिता पालकांच्या संमतीशिवाय घर सोडून भावेशकडे गेली. याप्रकरणी पीडित बालिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला भावेश तायडे याच्याविरुद्ध अपहरण, अत्याचारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२कलम ४,८,१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भावेशला अटक केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे तपास करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत