ए रिश्ता क्या केहेलाता है' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री वैशालीची गळफास लावून आत्महत्या
ए रिश्ता क्या केहेलाता है' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री वैशालीची गळफास लावून आत्महत्या
वृत्तसंस्था इंदोर-टीव्ही इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'ए रिश्ता क्या केहेलाता है' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली टक्करने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अभिनेत्रीने आपल्या इंदोरच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीने सुसाईड नोटसुद्धा लिहली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली ठक्कर गेल्या एक वर्षांपासून इंदोरमध्ये राहात होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येची माहिती समोर येताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांना वैशालीच्या मृतदेहा शेजारी सुसाईड नोटसुद्धा हाती लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेजाजी नगर परिसरातील पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. अद्याप अभिनेत्रीच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं नाहीय.
परंतु पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असल्याने लवकरच या घटनेचा उलघडा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.वैशाली टक्करने इंदोरमधील स्वतः च्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याने सेलेब्रेटींसह तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
वैशाली टक्करचे करिअर-
वैशाली टक्करने 2015 मध्ये 'ये रिश्ता क्या केहेलाता है' या लोकप्रिय मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या मालिकेत तिने संजना ही भूमिका साकारली होती. पहिल्याच मालिकेतून वैशालीला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेनंतर ती लगेचच 'ये है आशिकी' या कलर्स वाहिनीवरील मालिकेत दिसली होती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत