Header Ads

Header ADS

दिवाळीत अजनी-पुणे विशेष गाडी धावणार, भुसावळला दिलासा

 

Diwali-Ajni-Pune-Special- Train-Will-Run-Bhusawla- Dilasa

दिवाळीत अजनी-पुणे विशेष गाडी धावणार, भुसावळला दिलासा

लेवाजगत न्यूज भुसावळ- दिवाळीत बहुतांश गाड्यांना नो-रूम आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या चालवल्या जातात. त्यात आता अजनी- पुणे विशेष साप्ताहिक गाडीची भर पडणार आहे. पुण्याकडे जाणारी ही गाडी १९ ऑक्टोबर, तर पुण्याकडून येणारी गाडी १८ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

दिवाळीमुळे पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्वच गाड्या प्रवाशांनी खच्चून वाहत आहेत. यामुळे आरक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे. अनेक गाड्यांना नो रूम स्थिती असल्याने त्यांची तिकिट विक्री बंद झाली आहे. मात्र, सणासुदीत दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या सोडल्या आहेत. त्यात अजनी-पुणे ही साप्ताहिक गाडी धावणार आहे. ०११८९ क्रमांकाची पुणे-अजनी गाडी पुणे येथून दर मंगळवारी अजनीसाठी सुटेल. १८ ते २९ ऑक्टोबर या काळात या गाडीच्या सात फेऱ्या होतील. तर १९ ते ३१ ऑक्टोबर या काळात अजनी-पुणे ही गाडी (०११९०) दर बुधवारी सुटेल. या गाड्यांचा भुसावळ विभागातील प्रवाशांना देखील उपयोग होईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.