Header Ads

Header ADS

मोठी बातमी! ५० जणांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, उत्तराखंडमधील भीषण अपघात


 मोठी बातमी! ५० जणांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, उत्तराखंडमधील भीषण अपघात

लेवाजगत वृत्तसंस्था- उत्तराखंडच्या पौडी जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. ४५ ते ५० जणांना घेऊन जाणारी एक बस खोल दरीत कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी रावाना झालं आहे. ही बस ५०० मीटर खोल दरीत पडल्याने बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत. आतापर्यंत ६ जणांना जखमी अवस्थेत दरीतून बाहेर काढण्यात आलं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


‘एएनआय’ वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावाजवळ घडली आहे. येथील रिखनिखल-बिरोखल रस्त्यावर असणाऱ्या एका दरीत ही बस कोसळली आहे. या बसमध्ये सुमारे ४५ ते ५० जण प्रवास करत होते. दरम्यान, चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

     


प्रांताधिकारी सदर प्रेमलाल टम्टा यांनी अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे. धुमाकोट आणि रिखनिखल पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाल्याची माहितीही टम्टा यांनी दिली. ही बस ५०० मीटर खोल दरीत कोसळली असून आतापर्यंत ६ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती डीजीपी अशोक कुमार यांनी दिली आहे. ( या घटनेचा अधिक तपशील येणं बाकी आहे…)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.