Header Ads

Header ADS

विवाहितेचा बस मध्ये पाठलाग करणाऱ्यास यावल येथे चोप

Chasing-the-married-in-the-bus-comes-here-chop


 विवाहितेचा बस मध्ये पाठलाग करणाऱ्यास यावल येथे चोप 

लेवाजगत न्यूज यावल -सावदा येथून एका विवाहितेचा‎ एसटी बसमध्ये पाठलाग करत छेड‎ काढणाऱ्याला यावल बसस्थानकात‎ नागरिकांनी चांगलेच चोपले. यानंतर‎ त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. हा‎ ३२ वर्षीय संशयित चिनावल येथील‎ असून त्याच्यावर प्रतिबंधात्मक‎ कारवाई करण्यात आली.‎ सावदा येथून एक विवाहिता‎ एसटीने चोपडा तालुक्यात जात‎ होती. शोएब शेख मुख्तार (वय ३२,‎ रा.चिनावल ता.रावेर) या तरुणाने‎ तिचा पाठलाग केला. 

     तिच्याशी‎ जवळीक साधण्याचा प्रयत्न करत‎ छेड काढली. विवाहिता हा सर्व‎ प्रकार सहन करत होती. मात्र,‎ यावल आगारात एसटी पोहोचताच‎ तिने काही नागरिकांची मदत मागून‎ झालेला प्रकार कथन केला. यानंतर‎ जमावाने शेख शोएब याला चोप‎ दिला. जमावाच्या तावडीतून सुटून‎ तो पळून गेला.

    मात्र, नागरिकांनी‎ पाठलाग करून त्यास पकडले. नंतर‎ यावल पोलिसांच्या स्वाधीन केले.‎ महिलेने पोलिसांना आपबीती‎ सांगितली. नंतर संबंधितावर‎ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात‎ आली. पुन्हा कुणाला त्रास दिल्यास‎ कारवाईचा इशारा दिला. या‎ प्रकाराची चर्चा होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.