प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा इशारा - राज्यपाल नियुक्त १२ आमदारांत मला डावलू नका; पहिल्या यादीचाच विचार करावा लागेल, अन्यथा मी केस करेल
प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा इशारा -
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांत मला डावलू नका; पहिल्या यादीचाच विचार करावा लागेल, अन्यथा मी केस करेल
लेवाजगत न्यूज मुंबई-राज्यपालांना १२ आमदारांची कुणीही लिस्ट देऊ द्या, मी निकषात बसतो. पहिलेही सरकार निकषातच बसणारे आणि बाबासाहेबांच्या कायद्यात बसणारे होते. ते सरकारही अडीच वर्षे होते. त्या सरकारने जी नावे दिली त्यात मी निकषात बसतो. आताही मी निकषातच बसणार आहे, राज्यपालांना उत्तर द्यावेच लागणार आहे. जर माझे बारा जणांच्या यादीत नाव नसेल तर पहिल्या यादीनुसारच त्यांना नियुक्ती करावी लागेल. जर माझी आमदारपदी नियुक्ती झाली नाही तर मी केस करेल असा इशाराच प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी आज दिला.
प्रसिद्ध गायक आनंद शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एका खासगी वृत्त वाहिनीशी संवाद साधला.
राष्ट्रवादी कधीच सोडणार नाही
आनंद शिंदे म्हणाले, बाबासाहेबांचे विचार जिथे आहेत आणि त्या विचारांना माननारी लोक राष्ट्रवादी पक्षात आहेत तोपर्यंत मी पवार कुटुंबियांसोबत आहेत. बाबासाहेबांच्या विचारांना माननारे ते लोक आहेत म्हणूनच मी राष्ट्रवादी कधीच सोडू शकत नाही.
ठाकरेंची भेट घेतली
आनंद शिंदे म्हणाले, मी कलाकार आहे, आणि कलाकारांना जात-पात धर्म नसतो. त्यामुळे मला उद्धव ठाकरेंना भेटण्यात कसलीच अडचण नव्हती, कुणाचीही बंधने नव्हती. खुद्द शरद पवारांनीही मला सांगितले की, तुम्ही कलाकार आहात, तु्म्ही कुणाचेही गाणे गाऊ शकता. तुम्ही मला गाण्याबाबत सांगूही नका, अनुमती घेण्याचीही गरज नाही.
शिवसेनेच्या गाण्याचे टीझर येणार
आनंद शिंदे म्हणाले, शिवसेनेचे दसरा मेळाव्याच्या आत नवीन गाणे ऐकायला मिळणार आहे. ते ऐकल्यानंतर तुम्ही ठरवा ते कसे झाले. उद्या किंवा परवा सकाळी हे गाणे रिलीज होणार आहे. उद्या या गाण्याचे टीझरच बाहेर काढतो.
तर केसच करेल
आनंद शिंदे म्हणाले, राज्यपालांना १२ आमदारांची कुणीही लिस्ट देऊ द्या, मी निकषात बसतो. पहिलेही सरकार निकषातच बसणारे आणि बाबासाहेबांच्या कायद्यात बसणारे होते. ते सरकारही अडीच वर्षे होते. त्या सरकारने जी नावे दिली त्यात मी निकषात बसतो. आताही मी निकषातच बसणार आहे, राज्यपालांना उत्तर द्यावेच लागणार आहे. जर माझे बारा जणांच्या यादीत नाव नसेल तर त्यांनी मला काढले तरी हरकत नाही, पण बाबासाहेबांचे संविधान आहे. पहिल्या यादीनुसारच त्यांना नियुक्ती करावी लागेल. जर माझी आमदारपदी नियुक्ती झाली नाही तर मी केस करेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत